PM Surya Ghar Yojana 2024 Rooftop Solar subsidy Scheme पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024:Rooftop Solar Subsidy Scheme 2024

PM surya ghar yojana 2024 ही योजना एक केंद्रीय योजना आहे. ही योजना 15 फेब्रुवारी 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे उद्देश भारतातील १ कोटी घरांना प्रति महिना ३०० युनिट पर्यंत मुफ्त वीज देणे आहे. या योजनेमुळे घरा घराला सौर पॅनेल लावण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेद्वारे, गरीब श्रेणीतील किंवा कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या लोकांना ऊर्जा बिल कपातीचे फायदे दिले जातील. या योजनेत त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवून त्यांना मोफत ऊर्जा दिली जाईल.

PM surya ghar yojana 2024(Rooftop Solar Subsidy Scheme)या  योजनेअंतर्गत सरकारद्वारे सौर पॅनल खरेदी करण्यासाठी 60 टक्के सबसिडी दिली जाईल.PM surya ghar muft bijli yojana 2024 या योजनेंतर्गत प्रति किलोवॅट 30 हजार रुपये सबसिडी दिली जाईल. आणि जर तुम्ही 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल लावले तर तुम्हाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळेल.

पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे.

PM surya ghar yojana 2024  या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेले त्यांचे अर्ज https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत पोर्टलद्वारे सबमिट करू शकतात.

PM Surya Ghar Yojana 2024

Table of Contents

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024:Rooftop Solar Subsidy Scheme 2024 Highlights

योजनेचे नावPM सूर्य घर योजना 2024
कोणी सुरु केलीकेंद्र सरकार
लाभार्थीदेशातील पात्र नागरिक
उद्देश्यगरीब कुटुंबांना वीज उपलब्ध करून देणे व सौरऊर्जेला चालना देणे
लाभ300 युनिट वीज मुफ्त
विभागनवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://pmsuryaghar.gov.in/ 

PM surya ghar yojana 2024(Rooftop Solar Subsidy Scheme) : पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचे उद्दिष्ट

  • PM surya ghar yojana 2024 प्रतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
  • आर्थिक अडचणणी कमी करणे, खर्च वाचवने आणि पर्यावरण
    संवर्धनाला चालना देण्यासाठी.
  • या योजनेचे उद्देश भारतातील १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० युनिट पर्यंत मुफ्त वीज देणे आहे. 
  •  60 टक्क्यांपर्यंत सबसिडी

PM surya ghar yojana 2024(Rooftop Solar Subsidy Scheme) Benefits पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024 फायदे :

  • वीज बिलात कपात
  • प्रदूषण कमी
  • रोजगार निर्मिती
  • दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज

PM surya ghar yojana 2024(Rooftop Solar Subsidy Scheme): पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024 पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सोलर इन्स्टॉलेशन साठी जागा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक वेतन 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असावे.
  • तुम्हाला तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाने सौर पॅनेलसाठी इतर कोणतेही अनुदान घेतलेले नसावे.

PM surya ghar yojana 2024 Required Document: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • वीज बिल
  • शिधापत्रिका रेशनकार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते पासबुक

रूफ टॉप सोलार साठी 1KW, 2KW, 3KW किलोवॅटसाठी लागणारा खर्च आणि होणारे फायदे :

<
सोलर सिस्टम क्षमता (KW) अंदाजे खर्च अनुदान प्रतक्ष खर्च छतावरील लागणारी जागा दरमहा होणारी वीजनिर्मिती युनिट 8 रु. दराने होणारी बचत
1KW 52,000 18,000 34,500 100 Sq.Feet 120 युनिट 960
2KW 1,05,000 36,000 69,000 200 Sq.Feet 240 युनिट 1,920
3KW 1,57,000 54,000 1,03,000 300 Sq.Feet. 360 युनिट 2,880

PM surya ghar muft bijli yojana 2024 Apply: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या अधिकृत पोर्टल   https://pmsuryaghar.gov.in/ वर जावे लागेल.
  • यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • होम पेजवर, तुम्हाला Right Side विभागात Apply for Rooftop Solar या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • या मध्ये तुम्हाला तुमची माहिती या पेजवर दोन टप्प्यांत टाकावी लागेल.
  • तुम्हाला या पेजवर तुमच्या राज्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव निवडावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला वीज वितरण कंपनीचे नाव निवडावे लागेल आणि ग्राहक खाते क्रमांक टाकून Next च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुम्ही क्लिक करताच, रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
  • आता तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली माहिती अचूक भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता. 

PM surya ghar muft bijli yojana 2024 How to login: 
पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला Consumer Login च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.क्लिक करताच, लॉगिन पेज तुमच्या समोर उघडेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पेजवरील दिलेला कॅप्चा कोड टाकुन सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Surya Ghar Muft Bijli Yojana 2024 FAQ

2. पीएम सूर्य घर योजना 2024 काय आहे?

पीएम सूर्य घर योजना 2024 अंतर्गत 1 कोटी गरीब कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज दिली जाईल.

  1. पीएम सूर्य घर योजनेत किती अनुदान मिळणार ?

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे किलो वॅट वर निर्धारित आहे. 1KW = 18,000/- अनुदान, 2KW = 36,000/- अनुदान आणि 3KW = 54,000/- अनुदान अशा प्रकारे अनुदान मिळेल.

3. पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पीएम सूर्य घर योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी pmsuryagrah.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

Leave a comment