बांधकाम कामगार योजना :
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024:
राज्यात कामगारांचे भविष्य उज्वल होण्याकरिता महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारच्या योजना काढल्या आहेत आणि त्या योजनामध्ये बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. राज्यातील बांधकाम कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगार योजना कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.
बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात आणि कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षण करिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेमार्फत सुरू केल्या आहेत
महाराष्ट्र सरकारने 18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत MAHABOCW पोर्टल सुरू करण्यात आले. या पोर्टलद्वारे महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना लाभ दिला जाणार आहे. बांधकाम कामगार योजनेंतर्गत कामगारांना 2000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याशिवाय MAHABOCW पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कामगारांना इतर सुविधांचा लाभही मिळणार आहे. Maharashtra bandhkam kamgar yojana 2024
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 Highlights
Maharashtra bandhkam kamgar yojana 2024
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना |
विभाग | महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडल |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | बांधकाम कामगार |
लाभ | आर्थिक सहाय्य्य(5000 रु व भांडी संच) |
उद्देश | बांधकाम कामगारांचे सामाजिक व आर्थिक विकास करने |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabocw.in/ |
Bandhkam kamgar yojana Purpose :बांधकाम कामगार योजना उद्देश
- बांधकाम कामगार योजने मार्फत कामगारांचे जीवनमान व परस्थिती सुधारने.
- बाल कामगारांना धोकादायक क्षेत्रात काम न करू देणे.
- कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराची संधी वाढवणे
- कामगाराच्या कौशल्य विकास करणे
- कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी काम करणे
- कामगारांचे व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे.
- कामगारांना घातक कामापासून बाल श्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटीकरण प्राप्त करणे.
- कामगारांच्या रोजगार सेवांचा प्रचार करणे.
बांधकाम कामगार योजना चे फायदे(Benefits)
- बांधकाम कामगाराच्या लागण्याच्या खर्चासाठी 30,000/- रूपये अनुदान दिले जाते. (विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक)
- नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास मोफत मध्यान्ह भोजन सुविधा दिली जाते.
- श्रमयोगी मानधन योजनेच्या लाभ दिला जातो
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब 5,000/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते. (अवजारे खरेदी करणार असल्याचे कामगारांचे हमीपत्र देणे गरजेचे आहे)
- नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास जीवन ज्योती विमा योजनेमार्फत विविध लाभ दिले जातात
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरविले जातात.
- दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सदर नोंदीत बांधकाम कामगाराना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी प्रति कामगार 30,000/- रुपये अर्थसहाय्य दिले जातात.
Educational Assistance : शैक्षणिक सहाय्य
- महाराष्ट्र इमारत बांधकाम विभागात नोंदणी केलेल्या कामगाराचा पहिल्या दोन मुलांना पहिली ते सातवी मध्ये कमीत कमी 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर 2,500 शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिले जातात. (75 टक्के हजेरी बाबतच्या दाखला देणे गरजेचे आहे)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता 8वी ते 10वी मध्ये 75 टक्के किंवा त्या पेक्षा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी 5,000/- रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (75 टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (इयत्ता 10वी व 12वी ची गुणपत्रिका)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी 20,000/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता 1 लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता 60,000 रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी 20,000 रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी 25,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
- संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्तीसाठी करण्यात येते. ( MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / शुल्क पावती)
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात येईल.
Maharashtra Bandhkam kamgar Yojana 2024 Health Assistance :आरोग्यविषयक सहाय्य्य
- नोंदणी केलेला बांधकाम कामगार महिला असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाते. त्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शास्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1 लाख रुपये वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ दिला जातो. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे)
- बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये मुदत बंद ठेव लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुले नाहीत याच्या पुरावा आणि शपथपत्र आवश्यक आहे.
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत 2 लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जाईल. (75 टक्के अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी / मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके)
- नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.
- नोंदणीकृत कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. (शासकीय / निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
Financial assistance for maharashtra Bandhkam kamgar Yojana 2024: आर्थिक सहाय्य्य
- नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला / बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचं कायदेशीर वारसास 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकऱ्यानी दिलेला मृत्यू दाखला)
- नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत 2 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्याकरिता कामगार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहे याचे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र देणे आवश्यक आहे.
- घर बांधणी साठी 4.5 लाख रुपये अर्थसहाय्य (केंद्र शासन 2 लाख रुपये व कल्याणकारी मंडळ 2.5 लाख रुपये) दिले जाईल.
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास 10,000/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
- नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त 2 वर्षांपर्यंत प्रतिवर्षी 24,000/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
- घरखरेदी किंवा घरबांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाईल. (राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा / कर्ज विम्याची पावती / घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा)
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास 6,000/- रुपये अर्थसहाय्य दिले जातील.
Maharashtra Bandhkam kamgar Yojana 2024 (List of work type) लाभ घेण्यासाठी कामगारांच्या कामांची यादी:
Maharashtra Bandhkam Yojana 2024:
- रेल्वे
- ट्रामवे
- एअरफील्ड
- सिंचन
- रेडिओ
- जलाशय
- पाण्याचे तलाव
- बोगदे
- ब्रिज
- कल्व्हर्ट
- पाणी बाहेर काढणे
- दूरदर्शन
- टेलिफोन
- टेलिग्राफ आणि परदेशी संप्रेषण
- धरण कालवे
- तटबंध आणि नेव्हिगेशन कामे
- पूर नियंत्रणाची कामे (स्टॉर्म वॉटर ड्रेनेजच्या कामांसह)
- पिढी
- विजेचे पारेषण आणि वितरण
- पाण्याची कामे (पाणी वितरणाच्या वाहिन्यांसह)
- तेल आणि वायू प्रतिष्ठापन
- वीज ओळी
- वायरलेस
- जलवाहिनी
- लाइन पाईप
- टॉवर्स
- वायरिंग, डिस्ट्रीब्युशन, टेंशनिंग इत्यादींसह इलेक्ट्रिकल काम.
- सौर पॅनेल इत्यादी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची स्थापना.
- स्वयंपाक करण्यासारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मॉड्यूलर युनिट्सची स्थापना
- सिमेंट काँक्रीट साहित्य तयार करणे आणि बसवणे इ.
- वॉटर कूलिंग टॉवर
- ट्रान्समिशन टॉवर आणि अशी इतर कामे
- दगड कापणे, तोडणे आणि दळणे
- अग्निशामक यंत्रांची स्थापना आणि दुरुस्ती
- वातानुकूलन उपकरणांची स्थापना आणि दुरुस्ती
- स्वयंचलित लिफ्टची स्थापना इ.
- सुरक्षा दरवाजे आणि उपकरणांची स्थापना
- फरशा किंवा फरशा कापून पॉलिश करणे
- पेंट, वार्निश इ. सह सुतारकाम.
- गटर आणि प्लंबिंगचे काम
- लोखंडी किंवा धातूच्या ग्रील्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे आणि स्थापित करणे
- सिंचन पायाभूत सुविधांचे बांधकाम
- सुतारकाम, आभासी कमाल मर्यादा, प्रकाशयोजना, प्लास्टर ऑफ पॅरिससह अंतर्गत काम (सजावटीच्या कामासह)
- काच कापणे, काच प्लास्टर करणे आणि काचेचे पॅनेल स्थापित करणे
- कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या विटा, छप्पर इत्यादी तयार करणे
- जलतरण तलाव, गोल्फ कोर्स इत्यादींसह क्रीडा किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम.
- माहिती फलक, रस्ते फर्निचर, प्रवासी निवारा किंवा बस स्थानके, सिग्नलिंग सिस्टीम बांधणे
- रोटरी बांधकाम
- कारंजे स्थापना
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, नयनरम्य परिसर इत्यादींचे बांधकाम तयार करणे.
Maharashtra Bandhkam kamgar Yojana Sefety Kit :बांधकाम कामगार पेटी योजना:
कामगारांना राज्य सरकार सुरक्षेसाठी अनेक प्रकारचे साहित्य किंवा वस्तू बांधकाम कामगार योजनेअंतर्गत देत असतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार दरवर्षी कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजनेमार्फत पेटी Sefety Kit सुद्धा देतात. या पेटीमध्ये कामगाराच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या वस्तू Sefety Kit दिल्या जातात.
बांधकाम कामगार योजना पेटी मधील मिळणाऱ्या वस्तू
- बॅग
- जॅकेट
- सेफ्टी हेल्मेट
- चार कप्प्याच्या जेवणाचा डबा
- सेफ्टी बूट
- सोलर टॉर्च
- सोलर चार्जर
- पाण्याची बॉटल
- मच्छरदाणी जाळी
- सेफ्टी बूट
- हात मोजे
- चटई
बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता:(Eligibility criteria)
1)कामगार महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा
2) कामगाराचे वय 18 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असावे
3) कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे
4) कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे
5) कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे
6) योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू होईल
7) बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर, अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेच्या लाभ दिला जात नाही
How to Apply for Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024: बांधकाम कामगार नोंदणी
- बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट www.mahabocw.in वर जावे लागेल.
- यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला कामगार पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि कामगार नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
- आता तुम्हाला तुमची पात्रता संबंधित माहिती या पेजवर टाकावी लागेल.
- माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला तुमची पात्रता तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल.
- आता तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावे लागेल.
- यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेवटी तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल . अशा प्रकारे तुम्ही सहज ऑनलाइन नोंदणी करू शकाल.
How to login in BOCW portal for Maharashtra bandhkam kamgar yojana 2024 : पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://mahabocw.in/ वर जावे लागेल .यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.होम पेजवर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल
2. तुम्ही क्लिक करताच तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल.
3. आता तुम्हाला या पेजवर विचारलेली माहिती जसे की ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
4. यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल .
5. अशा प्रकारे तुम्ही MAHABOCW लॉगिन करू शकता.