MNREGA payment status through PFMS portal:
रोजगार हमी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले की नाही कसे चेक करावे ? :
रोजगार हमी योजन(MNREGA) काय आहे ?:
वैयक्तिक तसंच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणं, फळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे
पण, रोजगाराची हमी मिळाल्यानंतर मनरेगाच्या मजुरीचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले हे पाहणे गरजेचे आहे.
MNREGA payment status through PFMS portal (DBT status of Beneficiay and payment detail)
हे तुम्ही MNEGAच्या अधिकृत वेबसाईट द्वारे आणि PFMS पोर्टल द्वारे पाहू सकता.
आपण घरबसल्या ही माहिती फोनवर पाहू शकतो. ती कशी हेच आपण आता जाणून घेऊया.
PFMS पोर्टल द्वारे पहायेचे असेल तर जोब कार्ड नंबर माहित असणे गरजेचे आहे.
सर्व प्रथम आपण नरेगा जॉब कार्ड कसं पाहायचं हे बघू या.
मनरेगा जॉब कार्ड कसं पाहायचं?: How to check job card online
- MNREGA जॉब कार्ड पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायेचेआहे अधिकृत वेबसाईट https://nrega.nic.in/HomeGP_new.aspx वर click करा किवां google वर MNREGA असं सर्च करा.
- MNREGA अस सर्च केल्यानंतर त्यानंतर Mahatma Gandhi NREGA | Ministry of Rural Development असं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल यातील Gram Panchayat या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर एक नवीन रकाना तुमच्यासमोर ओपन होईल. यांतील दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे जनरेट रिपोर्ट्स यावर क्लिक करावे लागेल.
- मग तुमच्यासमोर देशातल्या सगळ्या राज्यांची नावं ओपन होतील. यातील संबंधित राज्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर Gram Panchayat Module नावाचं नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- फायनान्शियल ईयर मध्ये आर्थिक वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि मग गाव निवडायचं आहे.
- हे सगळं निवडून झालं की मग प्रोसिड यावर क्लिक करायचं आहे.
- यानंतर Gram Panchayat Reports नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर R1, R2, R3, R4, R5, R6 असे रकाने दिलेले असतील.
- यातील R1 या रकान्यातील Job card/Employment Register आणि या पाचव्या क्रमाकांवर Registration Application Register वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या ग्रामपंचायतीत मनरेगाचे जितके जॉब कार्ड रेजिस्टर आहे, ते दिसतील.
PFMS म्हणजे काय ?
- PFMS या शब्दाचा अर्थ Public Financial Management System असा आहे मराठी मध्ये सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा (पीएफएमएस) या नावाने ओळखले जाते.
- PFMS ही एक अशी प्रणाली आहे जिच्या मदतीने सरकारकडून दिले जाणारे अनुदान Subsidy आणि त्याच्याशी संबंधित इतर आर्थिक लाभ थेट वापरकर्त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात.
PFMS पोर्टल चे फायदे
- पीएफएमएस PFMS च्या मदतीने, पैसे थेट वापरकर्त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात, ज्यामुळे कसलाही भ्रष्टाचार न होता वापरकर्त्यांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळतात.
- लाभार्थ्यांना आता कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत नाहीत. किंवा सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन विनवण्या करण्याची गरज उरलेली नाही.PFMS हे NPCI च्या आधारे Direct Benefit Transfer (DBT) लाभार्थ्यांच्या बँकेत थेट ट्रान्सफर करते.
- पीएफएमएस मुळे, सरकारने चालवलेल्या कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत लवकर येऊ लागला आहे, अन्यथा पूर्वी या प्रक्रियेस बराच वेळ लागत असे.
- PFMS प्रणालीमुळे वापरकर्त्यांचा बराच वेळ वाचत आहे आणि यामुळे या कामात पारदर्शकता आली आहे. लाभार्थ्यांना जलद लाभ वितरण करता येते.
- ही प्रणाली पूर्णपणे Electronic Payment System वर आधारित आहे, जी पूर्णपणे Computer Software आणि Internet वर आधारित आहे. म्हणजेच कोणीही तिसरी व्यक्ती यामध्ये छेडछाड करू शकत नाही.
PFMS द्वारे कोणते DBT status पाहू सकता?
- विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या Scholarship रक्कम.
- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणारा लाभ.
- वृद्धा पेन्शन योजनेंतर्गत मिळणारा लाभ
- शेतकरी किंवा इतर वर्गातील कर्जमाफीचा लाभ.
- गॅस सिलिंडरवर देण्यात येणारे सरकारी अनुदान.
- MGNREGA मनरेगा अंतर्गत काम करणार्या मजुरांचे पैसे.
इतर अनेक DBT payment status तुम्ही चेक करू सकता.
DBT status of Beneficiary and payment detail by Job card Number :PFMS मध्ये जॉब कार्ड नंबरद्वारे पेमेंट कसे तपासायचे
- google वर PFMS असं सर्च करा सर्च केल्या नंतर DBT status of Beneficiary and payment detail लिंक दिसेल त्यावर click करावे लागेल.
- त्यानंतर DBT status of Beneficiary and payment detail पेज ओपन होईल
- categoy मध्ये NREGA पर्याय निवडा.
- जॉब कार्ड नंबर टाका आणि सर्च बटन वर क्लिक करा
- अशा प्रकारे तुम्हाला सगळी माहिती दिसेल जसे की payment status, cedit amount ,cedit date,bank name इत्यादी.
DBT status of Beneficiary and payment detail by Account Number: PFMS मध्ये बँक खात्याद्वारे डीबीटी पेमेंट कसे बघायेचे
- सर्व प्रथम PFMS च्या अधिकुत वेबसाईट https://pfms.nic.in/Home.aspx वर Click करावे.
- Home Page वर आपणास Paymen status मेनू दिसेल त्यातील know your payment वरती. क्लिक करावे.
- येथे आपल्याला आपल्या Bank account संबंधित माहिती भरावी लागेल.
ज्यामध्ये आपणाला आपले बँकीचे नाव आणि Bank account number भरावे लागेल. - यानंतर खाली दिलेला captcha भरावा. ज्यावर काही शब्द लिहीले जातील ते बॉक्समध्ये भरावे.
- captcha भरल्यानंतर आता आपल्याला send otp on resgistered mobile no क्लिक करावे लागेल,
- त्यानंतर एक OTP येहील veify करा आणि seach करा
- अशाप्रकारे तुम्हाला कोणत्या sceme चे किती पैसे cedit झाले सगळी माहिती दिसेल जसे की sceme name, status, cedit date,cedit amount इत्यादी.