Mukhyamantri Vayoshri Yojana 2024:मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची आर्थिक मदत.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजना

Mukhyamantri vayoshri Yojana2024 : गरजू लोकांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या   जातात यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जेष्ट नागरिकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्त राखण्यासाठी आर्थिक मदद महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.या अंतर्गत दिले जाणारे तीन हजार रुपये हे एक रकमी दिले जातील आणि ही रक्कम एकदाच मिळणार आहे.ही रक्कम DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिली जाईल .या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 480 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.

 महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात जसे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वृद्धाश्रम’ योजना ,ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मातोश्री वृद्धाश्रम’ योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी बस भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) सवलत, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, असे अनेक योजना सुरू केल्या आहेत यातील मुख्यमंत्री वयोश्री योजना ही देखील एक कल्याणकारी योजना आहे.

Mukhyamantri vayoshri Yojana2024 या योजने करता कशा पद्धतीने अर्ज करायचा या योजनेचे ची पात्रता ,फायदे आणि आवश्यक कागदपत्रे याबाबतची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण समजून घेणार आहोत

Table of Contents

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Higlights : मुख्यमंत्री वयोश्री योजना

योजनेचे नाव Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवात 5th Feb 2024
उद्देश महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे.
बजेट रक्कम ४८० करोड रुपये
लाभ ३ हजार रुपये आर्थिक मदत, उपकरणे .
लाभार्थी राज्यातील ज्येष्ठ नागरिक
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 वैशिष्ट्ये :मुख्यमंत्री वयोश्री योजना

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेद्वारे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे आणि इतर बरेच लाभ मिळणार आहेत.

ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे हेतू हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय आणि सन्माननीय जीवन जगण्यास मदत करेल.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 :मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत मिळणारे उपकरणे

  • फोल्डिंग वॉकर
  • बॅक सपोर्ट बेल्ट
  • व्हील चेयर
  • सर्वाइकल कॉलर
  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • स्टिक व्हीलचेयर
  • कमोड खुर्ची
  • नि-ब्रेस लंबर बेल्ट

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Benefits :मुख्यमंत्री वयोश्री योजना फायदे

  • महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री वायोश्री योजना या योजनेद्वारे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे आणि इतर बरेच लाभ मिळणार आहेत.
  • वार्षिक 480 कोटी राज्य सरकार खर्च करणार.
  • ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान अपंगत्व अशक्तपणाच्या निराकारणाकरता आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी योजना.
  • ३००० रुपये थेट खात्यात डीबीटीने जमा होणार

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 eligibility :मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

  • या योजनेच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्रातील नागरिक पात्र राहतील
  •  31 डिसेंबर 2023 रोजी ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे होईल ते या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील लाभार्थी यासाठी पात्र राहणार आहेत

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 Document List:मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र
  • वयाचा पुरावा
  • रेशनकार्ड
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेची खाते पासबुक प्रत
  • स्वयं-घोषणा पत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सदर लाभार्थ्याला सादर करावी लागणार आहेत.

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे :

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • वृद्ध व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्तीने दुसऱ्या उपकरणांसाठी अर्ज केला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online. :मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाइन अर्ज

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 योजने संबंधित मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु याची अर्ज प्रक्रिया अजून सुरू करण्यात आलेले नाही. नवीन येताच मुख्यमंत्री वयोश्री योजने साठीअर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती देण्यात येईल

Mukhyamantri Vayoshri Yojana FAQ :मुख्यमंत्री वयोश्री योजना

1. मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्य मातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

2.मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ  हा ६५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मिळणार आहे. 

Leave a comment