महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024:Rojgar Hami Yojana 2024
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे.
बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1977 मध्ये रोजगार कायदा लागू केला.
राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 नुसार दोन योजना सुरु होत्या.
- ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 कलम 12 (ई)नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना
सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते.
सन 2005 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला. ग्रामीण भागात राहाणा-या व अंगमेहनतीची कामे करणा-या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्याची रोजगार हमी योजना व केंद्राची ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली.
या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो.या योजनेंतर्गत केंद्र शासन 100 दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व 100 दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 वैशिष्ट्ये Rojgar Hami Yojana 2024
- मागेल त्याला काम या तत्वावर ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंदीय निधीतून केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रति कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते. महाराष्ट्र सरकार 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी देते.
- मजुराना काम मागणी करण्यासाठी जॉब कार्ड हे एक प्रमुख दस्तऐवज आहे.ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे. ज्यामध्ये घरातील सर्व प्रौढ सदस्यांची नावे आणि छायाचित्रे असतात. जेणेकरून ते कामाची मागणी करू शकतील आणि काम मिळवू शकतील.अंगमेहनतीने काम करण्याऱ्या कुटूंबातील इच्छूक प्रौढ व्यक्तींनी लेखी किंवा तोंडी नोंदणीसाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे अर्ज करावा लागतो.
- काम मागणी किंवा अर्ज केल्याच्या पंधरा दिवसांच्या आत संबंधित मजुराला काम प्रदान केले जाईल.
- मजुराने काम मागणी केल्यानंतर 15 दिवसाचे काम काम उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मजुराला मग्रारोहयो च्या नियमांनुसार बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे.
- ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्याला ग्रामसभेत सहभागी होण्याचा आणि त्यांच्या ग्राम पंचायतीसाठी मनरेगा अंतर्गत घेण्यात येणारी कामे आणि प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार आहे.
- मजूराला तिच्या/त्याच्या निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या आत काम देणे आवश्यक आहे. एखाद्या मजूराला त्याच्या राहत्या घरापासून ५ किलोमीटरच्या पलीकडे कामाचे वाटप केले असल्यास, मजूराला प्रवास भत्ता मिळण्याचा अधिकार आहे.
- मजुरांची मजुरी काम केल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यावर e-fms प्रणालीव्दारे किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते. अन्यथा ०.०५% विलंब आकारणी देय होते.
- पुरुष आणि स्त्रियांना सामना रोजगार दर दिला जातो.
- मजुरा मार्फत करता येण्यासारख्या कामावर मशीनरी लावण्यास बंदी.
- कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार, बरोबर आणलेल्या ६ वर्षांखालील लहान मुलांना सांभाळण्याची सोय इत्यादी सुविधा असायला हव्यात. तसेच, दुखापत झाल्यास रुग्णास सर्व रुग्ण सेवा व दैनिक मजुरीच्या ५०% रुग्ण भत्ता देण्यात येतो. अपंगत्व व मृत्य झाल्यास रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान व कुटूंब नियोजनासाठी सवलती देण्यात येतात.
Rojgar Hami Yojana 2024 Highlights:
योजनेचे नाव | रोजगार हमी योजना(MNREGA) |
---|---|
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | ननागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | राज्यातील ग्रामीण भागातील नागरिक |
लाभ | रोजगाराची हमी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन (ग्रामपंचायती मार्फत) |
अधिकृत वेबसाईट | nrega.nic.in/ |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 फायदे Rojgar Hami Yojana 2024
- ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांना त्यांच्या 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
- या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
- ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल व मजुरांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होईल.
- कामाची मागणी केल्यानंतर मजुराला 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर त्याला रोजगार भत्ता दिला जाईल.
- ग्रामीण भागातील मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
वैयक्तिक कामांचा लाभ देताना खालील प्रवर्गातील कुटुंबाना प्राधान्य : Rojgar Hami Yojana 2024
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- अधिसूचित जमाती
- दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे
- महिलां कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब
- शारीरिकदृष्ट्या अपंग प्रमुख कुटुंब
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- IAY / PMAY अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी.
ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या: Rojgar Hami Yojana 2024
- कुटुंबाची नोंदणी
- रोजगार उपलब्ध करणे
- ग्रामसभेच्या माध्यमातून रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज घेणे, त्याचप्रमाणे नियोजन आराखडा व कामाचे प्राधान्य ठरविणे.
- सामाजिक अंकेषण (Social Audit) व पारदर्शकता.
- दक्षता समिती
- रोजगार दिवस
महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 उद्दिष्ट :Rojgar Hami Yojana 2024
- ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देणे हा रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा आर्थिक विकास करणे.
- ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
- ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागातील मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या
- गरीब कुटुंबांना रोजगार मिळवून देण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
- ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करणे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 सार्वजनिक स्वरुपाची कामे :Rojgar Hami Yojana 2024
- विहिरी/पाझर तलाव/गाव तलावतील गाळ काढणे
- पांदण/शेत / वन क्षेत्रातील/गावाअंतर्गत रस्ते / पायवाटा तयार करणे
- फळबाग लागवड करणे (फलोत्पादन)
- रेशीम उत्पादन, रोपमाळा व वनीकरण करणे
- खतनिर्मिती करणे
- पशुसंवर्धनाची कामे करणे
- जल व घनकचरा व्यवस्थापन करणे
- स्वच्छतागृह बांधकाम करणे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 वैयक्तिक स्वरुपाची कामे :Rojgar Hami Yojana 2024
- प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल काम
- फळबाग लागवड
- वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.)
- सिंचन विहीर
- शेततळे
- शोषखड्डे
- जनावरांचा गोठा
- कुक्कुटपालन शेड
- शौचालय
- जलसंधारणाची कामे
वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी अर्जदार मजुराला लागणारी आवश्यक कागदपत्रे:Rojgar Hami Yojana 2024
- विहित नमुन्यात अर्ज
- जॉबकार्ड
- ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- फोटो
- ७/१२ व ८ अ
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता :Rojgar Hami Yojana 2024
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- रोजगारासाठी अर्ज करणारा व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
- रोजगारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
- अर्जदाराची अंग मेहनतीची कामे करण्याची तयारी असावी.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जॉबकार्ड काढण्याची पद्धत :Rojgar Hami Yojana 2024
- संबंधित मजुराने खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायत किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे द्यावी.
- 1. गावातील रहिवाशी असल्याचा पुरावा (रेशनकार्ड zerox, आधारकार्ड zerox, इतर कोणताही पुरावा)
- बँक पासबुक zerox
- 3. फोटो
सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर हा nrega साठी पात्र ठरतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना काम मागणीची पद्धत :Rojgar Hami Yojana 2024
- काम मागणीचा अर्ज भरून देणे.
- जॉबकार्ड details.
- काम मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम दिले जाते. जर १५ दिवसांत काम दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता देण्यात येतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024 मजुरी दर :Rojgar Hami Yojana 2024
वर्ष :2024 मजुरी दर:273 रुपय प्रतिदिवस
Официальное получение диплома техникума с упрощенным обучением в Москве
промокод на подключение продамуса https://prodamus-promokod1.ru/ .